By  
on  

अभिनेता शशांक केतकरने शेयर केली ही आठवण, म्हणतो "आम्ही तेव्हाचे आणि आत्ताचे"

दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेकांचे भावा-बहिणींचे फोटो, फॅमिली गेटटुगेदरचे फोटो पाहायला मिळत आहेत. यातच अनेक सेलिब्रिटींनी भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींसोबतचे तर काहींनी भावांसोबतचे फोटो शेयर केले आहेत.

अभिनेता शशांक केतकरने मात्र एक खास आठवण शेयर केली आहे. शशांकला खोलीची आवरा आवर करताना बहिणीसोबतचा लहानपणीचा फोटो सापडला आहे. या फोटोत त्यांच्या हातात एक खेळणं सुद्धा आहे. हे खेळणं दोघांनी अजूनही जपून ठेवलय. फोटो आणि खेळणं सापडल्यावर शशांक आणि बहिणीने तो फोटो पुन्हा रिक्रिएट केला आहे.

 

पुन्हा त्या फोटोसारखी पोझ देऊन शशांक आणि त्याच्या बहिणीने फोटो काढला. शशांक या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीतो की, "खोलीची आवरा आवर करताना हा photo आणि तेच खेळणं सापडलं ! बघा आम्ही तेव्हाचे आणि आत्ताचे."

या फोटोच्या निमित्ताने शशांक आणि त्याच्या बहिणीने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive