नऊवारी साडीत अनेक अभिनेत्रींचे खास लुक आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नऊवारी लुकमध्ये नेहमीच एक वेघली छाप सोडते. नुकतच चला हवा येऊ द्याच्या नव्या मंचावर दिवाळी स्पेशल एपिसोडसाठी सोनाली उपस्थित होती. यावेळी दिवाळीच्या कार्यक्रमासाठी सोनाली नटून थटून गेली होती. यासाठी खास रॉयल नऊवारी सोनालीने नेसली होती. नुकत्याच या सुंदर लुकमधील फोटो सोनालीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.
एवढच नाही तर या पोस्टमध्ये सोनालीने लिहीली आहे एक खास चारोळी. ती लिहीते की, " यंदा चा पाडवा झाला एका नव्या कोऱ्या फार्महाऊसवर चला हवा येऊ द्याच्या रिनोवेट झालेल्या मंचावर, दिवाळीच्या कार्यक्रमाला नटून जायचं आहे म्हंटल्यावर रॉयल टास्टाने बनवली ही भरजरी नऊवार, त्यांनीच दागिने चढवले, नथ, झुमके, टेम्पल ज्वेलरी, कंबरेला बेल्ट, पायात मोजडी वरेल बाफनावाली,चला तर मग झी मराठी लावा कार्यक्रमाची वेळ झाली, फक्त कमेंट मध्ये काहीतरी वेगळं लिहा नको तेच ते ‘अप्सरा आली. P.S. चारोळी माझी आहे....आवडली तर सांगा
नाहीतर मग, नुस्त्या फोटोंना तरी लाईक मारा."
या मजेशीर चारोळीसोबतच सोनालीचे खास रॉयल लुक यात पाहायला मिळाले. शिवाय सोनालीने तिच्या पोस्टमध्ये खास व्हिडीओही शेयर केला आहे. 'चालताना पदर झाडी गं...' गाण्यावर हा व्हिडीओ केला आहे.
सोनालीच्या या लुकमधील फोटो, व्हिडीओला जबरदस्त लाईक्स आणि कमेट्स मिळाल्या असून हा लुक चर्चेत आहे.