अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या वडिलांसाठी सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ईशा नुकतीच तिच्या आईसोबत गोव्या गेली असताना तिने बीचवर आईसोबत आनंद लुटला. मात्र यावेळी तिने बाबांसाठी एक खास गोष्ट केली आहे. यावेळी बीचच्या वाळूवर बाबा लिहून कोरलं. ईशाने आईसोबतच्या फोटोसोबतच हा फोटोही सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. ईशा या पोस्टमध्ये लिहीते की, "बाबा, फक्त तुझ्यासाठी"
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत ईशा शनायाच्या भूमिकेत दिसली होती. मात्र त्यानंतर काही कारणास्तव ईशा या मालिकेतून बाहेर पडली. आणि त्या जागी पुन्हा अभिनेत्री रसिका शनायाच्या भूमिकेत दिसतेय. ईशाने अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमध्ये काम केलय. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावर ईशाचे तिचा बॉयफ्रेंड अभिनेता ऋषि सक्सेनासोबतचे फोटो देखील चर्चेत असतात.