EXCLUSIVE : "शबाना आझमी यांना ट्रॉमा वॉर्डमध्ये शिफ्ट करणार, तुमच्या प्रार्थनांची गरज, हे कुणाचं षडयंत्र याची चर्चा नको" - जावेद अख्तर

By  
on  

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या अपघातात शबाना आझमी यांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात जावेद अख्तर सुखरुप बचावले आहेत. मात्र यावर पिपींगमूनला जावेद अख्तर यांनी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे, जावेद अख्तर म्हटले की, "सध्या परिवाराच्या प्रतिक्षेत आहोत, हे कुणाचं षडयंत्र आहे याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. शबाना यांना ट्रॉमा वॉर्डमध्ये हलवण्यात येणार आहे.. यात कुणाची चूक होती याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. आम्ही तिसऱ्या रांगेत होतो आणि अचानक ड्रायव्हरने टर्न घेतला, सफारी ट्रकला डाव्या बाजुने धडकली आणि शबाना या डाव्या बाजुलाच बसल्या होत्या."

 

 

Recommended

Loading...
Share