'हॅरी पॉटर' मधील अभिनेत्री हेलेन मेकक्रोरी यांचं कॅन्सरने निधन, वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By  
on  

'हॅरी पॉटर' या प्रसिद्ध हॉलिवुड सिनेमाच्या सिरीजमध्ये नार्सिसा मैलफॉय ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हेलेन मेकक्रोरीचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हेलेन यांनी अखेरचा श्वास घेतला. हेलेने यांना कॅन्सरची लागण झाली होती. हेलेन यांच्या निधनाची बातमी तिचा पति डेमियन लुइसने दिली आहे. 

हेलेने मेकक्रोरीचे पति डेमियन लुइस ने ट्विटरवर लिहीलं की, "हे सांगताना मला त्रास होतोय की कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर सुंदर आणि मजबूत महिला हेलेन मेकक्रोरी ने जगाचा निरोप घेतला आहे. तिचं निधन घरी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत झालं आहे. तिचं निधनही असं झालं जसं तिने जिवन जगलं होतं. देवाला माहिती आहे की आम्ही तिच्यावर प्रेम करतो आणि स्वत:ला भाग्यशाली मानतो की आमच्या जीवनात तिच्यासोबत वेळ घालवायची संधी मिळाली. ती खूप छान चमकली आणि आता हवेसोबत वाहत राहील, धन्यवाद."

 अभिनेत्री हेलेने मेकक्रोरी या एक ब्रिटीश अभिनेत्री होती. हॉलीवुड इंडस्ट्रीमधील सगळ्यात प्रसिद्ध आणि टॅलेंटेड स्टार म्हणून त्यांची ओळख होती. 'हॅरी पॉटर' सोबतच 'पीकी ब्लाइंडर्स' मधील पोली ग्रेच्या भूमिकेतून तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं. याशिवाय जेम्स बॉन्डचा सिनेमा 'स्काईफॉल', 'ह्यूगो', 'द क्वीन' आणि 'द स्पेशल रिलेशनशिप' यासारख्या सिनेमांमध्येही हेलेन यांनी काम केलं आहे. फिल्म आणि टेलिव्हिजनसोबत हेलेन यांनी थिएटरही केलं आहे. 1990 पासून 2010 या काळात त्यांनी 25 पेक्षा जास्त स्टेज प्रोडक्शन साठी काम केलं. ज्यात 'प्राइड एंड प्रेज्यूडिस', 'मैकबेथ', 'एस यू लाइक इट', 'मेडा संग' यांचा त्यात समावेश आहे.

Recommended

Loading...
Share