By  
on  

Lata Mangeshkar Health Update : एक्सट्यूबेशन चाचणीसाठी लता दीदींचे व्हेंटिलेटर काढले, दीदी अजूनही आयसीयूमध्येच

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची नवीन अपडेट नुकतीच मंगेशकर कुटुंबियांनी दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचं सांगत त्यांनी स्टेटमेंट जारी केलय. 92 वर्षांच्या लतादीदींना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना 8 जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मंगेशकर कुटुंबियांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये लता दीदी अजूनही आयसीयू मध्ये असल्याचं म्हटलंय. मात्र त्यांचं व्हेंटिलेटर काढल्यांचही या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलय.

मंगेशकर परिवाराने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलय की, "लता दीदी आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.आज सकाळी त्यांना एक्सट्यूबेशनची चाचणी देण्यात आली आहे (आक्रमक व्हेंटिलेटर बंद). सध्या त्यांची प्रकृती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु सध्या त्या डॉ प्रतित समदानी यांच्या अध्यक्षतेखालील डॉक्टरांच्या टीमच्या निरीक्षणाखाली  राहतील. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आम्ही प्रत्येकाचे आभार मानतो."

 

तेव्हा दीदींच्या प्रकृतीत सुधारणा आल्याची चिन्हे दिसत असली तरी त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलय. मात्र एक्सट्यूबेशन चाचणीसाठी त्यांचं व्हेंटिलेटर गुरुवारी सकाळी काढण्यात आल्याची महत्त्वाची गोष्ट त्यांनी यात नमूद केली आहे. 

लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांचे असंख्य चाहते प्रार्थना करत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive