By  
on  

गश्मिर महाजनीने या अभिनेत्रीसोबत केली बाईक राईड

सिनेमातील कोस्टार्सची केमिस्ट्रीही सिनेमाला आणखी खुलवते. अशीच केमिस्ट्री आगामी मराठी सिनेमा बोनसमध्ये दिसण्याची शक्यता आहे. कारण अभिनेता गश्मिर महाजनी आणि ग्लॅमरस स्टार पूजा सावंत ‘बोनस’ या सिनेमात एकत्र झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रिन झळकणार आहे. या सिनेमातील पोस्टर आणि पूजा सावंतचा लूकही नुकताच प्रदर्शित झाला आहे. पूजा सावंतचा या सिनेमात कोळीण दाखवली आहे. या सिनेमात पूजाची कोळीवाड्यातील भूमिका आहे. त्यामुळे या सिनेमाचं चित्रीकरणही कोळीवाड्यात झालेलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Candid ... on location #bonus #28feb2020 @iampoojasawant

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

नुकताच गश्मिर महाजनीने सिनेमाच्या चित्रीकरण दरम्यानचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. या व्हिडीओत गश्मिर बाईक राईड करतोय आणि पूजाही सोबत आहे. बाईक राईड करत कोळीवाड्यात फेरफटका मारतानाचा हा त्यांचा व्हिडीओ आहे. सोशल मिडीयावर या व्हिडीओला प्रचंड लाईक्सही मिळत आहेत. 

शिवाय नुकतच या सिनेमातील ‘माईक दे’ हे रॅप गाणंही प्रदर्शित झालय. या गाण्याची आता चर्चा होत आहे. पूजा सावंतनेही या सिनेमाच्या चित्रीकरणाचा ऑफस्क्रिन व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mic de @mc_azad7 Full song link in bio #bonus

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

येत्या 28 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive