Coronavirus: मराठी कलाकारांकडून नागरिकांना एक नम्र आवाहन, पाहा Video

By  
on  

करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काल २२ मार्च रोजीच्या जनता कर्फ्यूनंतर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मुबईंची जीवनवाहिनी लोकल सेवासुध्दा बंद करण्यात आली आहे. करोनासोबतचं युध्द आता सुरु झालं असून त्याविरोधात नेटानं लढा देणं ही प्रत्येक सुजाण नागरिकाती आता जबाबदारी आहे. 

भारतात सध्या करोनाचे एकूण ३९३ रुग्ण सापडले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे व त्यामुळे १०० री गाठण्यापूर्वीच लवकरात लवकर ही साखळी तोडण्यासाठी व करोनाला परतवून लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. 

बॉलिवूडकरांपाठोपाठ आता मराठी सिनेसृष्टीसुध्दा करोना विरोधातील युध्दात एकवटली आहे. मराठी कलाकारांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. सर्व कलाकार ह्यात करोनापासून बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे सांगताना पाहायला मिळतायत. 

सोनाली कुलकर्णी, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, रवी जाधव, भरत जाधव, तेजस्विनी पंडीत, सिध्दार्थ जाधव, अमृता खानविलकर, अमेय वाघ, अवधूत गुप्ते, जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सचिन पिळगावकर , सुबोध भावे आदी सर्वच कलाकारांकडून करोनाविरोधात घ्यायच्या खबरदारीपूर्वक सूचना पाळा असं कळकळीचं आवाहन करण्यात आलं आहे. 

लाडक्या कलाकारांनी ही जनजागृती केल्यामुळे चाहते व नागरिक नक्कीच त्यांना प्रतिसाद देतीय यात शंका नाही, तेव्हा देशावरचं व महाराष्ट्रावरचं हे अस्मानी संकट लवकर टळो हीच प्रार्थाना!

Recommended

Loading...
Share