एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा, सोशल मिडीयावर व्यक्त झाले कलाकार

By  
on  

प्रसिद्ध गायक, संगीतकार, अभिनेते एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं संगीतविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता रितेश देशमुख लिहीतो की, "हम बने तुम बने -एक दूजे के लिए,  एसपी बालासुब्रमण्यम जबरदस्त संगीतासाठी धन्यवाद. जड अंतकरणाने मी बोलतो की.. साथिया या तूने क्या किया?  तुम्हाला शांती लाभो."

 

तर अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणतात की, "पद्मभूषण  एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन हे भारती सिनेसृष्टीचं आणि भारतीय संगीत विश्वाचं मोठं नुकसान आहे."

 

तर प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी त्यांच्या साथिया तुने क्या किया गाण्याविषयी लिहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे."इतनी मोहब्बत सेह ना सकूँगा सच मानो जिंदा रह ना सकूँगा अब जीना मरना मेरा जानम तेरे हाथ है.. हे गाणं दुसऱ्या कोणत्याही आवाजात ऐकण्याची कल्पना करून बघा, करु नाही शकणार. फक्त एकच नाही खुप सारी हजारो गाणी. फॅन होतो आणि नेहमीच राहील. एसपी सर तुमची आठवण येईल. "  

 

यासह अनेक मराठी कलाकार आणि बॉलिवुड कलाकारांनी  एसपी बालासुब्रमण्यम यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Recommended

Loading...
Share