By  
on  

बालिका वधुचे असिस्टंट डायरेक्टर रामवृक्ष गौर यांच्यावर आली भाजी विकण्याची वेळ, अवस्था पाहुन दु:खी झाले अनूप सोनी

प्रसिद्ध मालिका बालिका वधुचे असिस्टंट डायरेक्टर रामवृक्ष गौर हे त्यांच्या गावी आजमगढ येथे भाजी विकत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने त्यांनी भाजी विकण्याचा पर्याय निवडला आहे. सध्या सोशल मिडीयावर हे वृत्त व्हायरल होताना दिसत आहे. आणि आता बालिका वधुची टीम त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत आहे. यासाठी रामवृक्ष यांना ते संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मालिकेत आनंदीच्या सासऱ्याच्या भूमिकेत दिसलेले अनूप सोनी यांना जेव्हा याविषयी कळाले तेव्हा त्यांनी लगेचच रामवृक्ष यांच्या बँक अकाउंटची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अनूप यांना रामवृक्ष यांची ही अवस्था पाहून खुप वाईट वाटले आहे. 
अनूप यांनी त्यांच्या ट्विटरवर याविषयी माहिती दिली आहे. ते लिहीतात की ,”ही खरतर दुख:ची बाब आहे. आमच्या बालिका वधूच्या टीमला याविषयी माहिती मिळाली आणि आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.”
लवकरच रामवृक्ष यांच्या बँक अकाउंटची माहिती मिळवून त्यांना बालिका वधूची टीम मदत करणार आहे.

नुकत्याच एका न्यूज पोर्टलशी बोलताना रामवृक्ष म्हणतात की, “मी आजमगढमध्ये सिनेमाच्या रेकीसाठी आलो होतो. जेव्हा लॉकडाउन घोषित करण्यात आलं तेव्हा आम्ही इथेच होतो. आणि पुन्हा परतणं शक्य नव्हतं. ज्या प्रोजेक्टवर आम्ही काम करत होतो, बंद झालं. निर्मात्यांनी कामाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी एक वर्ष लागणार असल्याचं सांगीतलं होतं. मग मी माझ्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि ठेल्यावर भाजी विकण्यास सुरुवात केली. मला या व्यवसायाची माहिती आहे आणि त्याविषयी मला कोणताच पश्चाताप नाही.”

Recommended

PeepingMoon Exclusive