By  
on  

नाग अश्विनच्या सिनेमात दीपिका पादुकोण आणि प्रभाससोबत झळकणार बिग बी

18 जुलैला पीपिंगमूनने सांगीतलं होतं की तेलुगू सिनेमांमधील मोठी प्रॉडक्शन कंपनी Vyjayanthi फिल्म्स लवकरच एक मोठी फिल्म अनाउंस करणार आहे. आणि काही कालावधीनंतर दिग्दर्शकाने दीपिका पादुकोण आणि प्रभास मुख्य भूमिकेत असल्याची घोषणा केली. 

याविषयी उत्सुकता आणखी वाढवत मेकर्सनी आता बिग बी अमिताभ बच्चनदेखील या सिनेमाचा भाग असल्याचं सांगीतलं आहे. भारतातील तीन मोठे सुपरस्टार्स एकाच सिनेमात घेऊन येत असल्याचं सांगत नुकतीच या सिनेमाच्या मेकर्सनी ही अनाउंसमेंट केली आहे. 

 

अमिताभ बच्चन आणि दीपिकाने 2015मध्ये शूजित सरकारच्या 'पीकू' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. आणि या आगामी सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच प्रभाससोबत झळकणार आहे. मात्र बिग बींच्या भूमिकेविषयी कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. बिग सरप्राईज म्हणत या सिनेमात बिग बी असल्याची घोषणा नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive