By  
on  

एका लक्ष्मीने दुस-या लक्ष्मीला दिल्या खास शुभेच्छा, जाणून घ्या

अक्षय कुमार स्टारर 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर काल 9 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि धमाकाच उडाला. अक्षय कुमार पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची भूमिका या सिनेमानिमित्ताने  साकारणार आहे. भारतामध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अक्षय आपल्या चित्रपटातून ट्रान्सजेंडर समुदायाच्या संवेदना पडद्यावर मांडणार आहे. 

ट्रान्सजेंडर समुदायामध्ये अक्षय कुमार ही भूमिका वठवत असल्याने आनंदाचं वातावरण आहे. ट्रांसजेंडर कार्यकर्त्या लक्ष्मी शुक्ला यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर पाहून आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी खास ट्विट करत अक्षयचं अभिनंदन केलं आहे. 

 

 

 

 

 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने यापूर्वी  ट्विट करत हा सिनेमा ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. हा सिनेमा डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येतोय.  तसंच आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा ‘कंचना ’ या सुपरहिट तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. यात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो असं काहीसं कथानक ह्यात आहे, त्यामुळे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive