By  
on  

गुजराती सुपरस्टार नरेश कनोडिया यांचे कोरोनाने निधन, दोन दिवसांपूर्वी झाले होते भावाचे निधन

गुजराती सिनेसृष्टीतील सुपरस्टार नरेश कनोडिया याचं कोरोनामुळे निधन झाले आहे. नरेश कनोडिया हे 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अहमदाबाद येथील यूएन मेहता इंस्टिट्यूट येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. कनोडिया यांच्या निधनाने संपूर्ण गुजराती सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

नरेश कनोडिया हे गुजराती फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार होते. त्यांनी गुजराती भाषेत असंख्य सिनेमे केले आहेत. त्यांचा मुलगा हितू कनोडिया हा देखील गुजराती सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून काम करतो. नरेश कनोडिया याचे भाऊ महेश कनोडिया हे भाजपचे राज्यसभा सदस्य होते. याशिवाय ते एक प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकारही होते. त्यांचा महेश कुमार एन्ड पार्टी ऑर्केस्ट्राही चांगलाच प्रसिद्ध होता.

महेश-नरेश या जोडीने काही सिनेमांना संगीत दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच महेश यांचे निधन झाले होते. महेश यांचं वय 83 होतं. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून शोक व्यक्त केलं होतं.

 

मात्र महेश कनोडिया यांचे दोन दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने आणि आता नरेश कनोडिया यांचे कोरोनाने निधन झाले. या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. गुजराती फिल्म इंडस्ट्रीला तर मोठा धक्का बसला आहे. सोशल मिडीयावर या दोन्ही कलाकारांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive