PeepingMoon Exclusive: विशाल भारद्वाजच्या अगाथा क्रिस्टीच्या नॉवेलवर आधारित सिनेमात झळकणार आलिया ?

By  
on  

विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमा हा प्रसिद्ध ब्रिटिश गृढकथा लेखक अगाथा क्रिस्टीच्या कामावर आधारित आहे. मागील महिन्यापासून ही गोष्ट चर्चेत आहे. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार आता भारद्वाज यांनी या सिनेमासाठी बॉलिवुड स्टार आलिया भट्टची निवड केली आहे.

 सूत्रांच्या माहितीनुसार असं समोर आलय की आलियाने या प्रोजेक्टसाठी होकार दिला आहे आणि हा सिनेमा साईन करण्याआधी ती शेवटच्या नरेशनची वाट पाहत आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यावरच या सिनेमाची घोषणा करण्यात येईल. सूत्र सांगतात की, "हे आता जवळपास ठरलय की आलिया भट्ट आणि विशाल भारद्वाज सोबत काम करणार आहेत. डायरेक्टर भारद्वाज जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये सिनेमाचं चित्रीकरण करण्यासाठी उत्सुक आहेत. आणि आलियाच्या डेट्सनुसार काम केलं जात आहे. मात्र लॉकडाउनच्या दुसऱ्या फेरीच्या अनिश्चिततेमुळे सिनेमाचं शूटिंग कधी होणार हे अजून निश्चित नाही. या सिनेमाला हिमालयात शूट करण्याची गरज आहे आणि यासाठी ते उत्तराखंडमध्ये जानेवारीत शूट नाही करत तर त्यांना 2021च्या दुसऱ्या भागात नंतर शूटिंग करावं लागेल."

 सध्या ही अनटाइटल्ड फिल्म आहे. जी आलियाची पहिली मिस्ट्री ड्रामा फिल्म असेल. ज्यात आलिया एका तरुण मुलीची भूमिका साकारेल, जिला एका हत्येचं रहस्य शोधून काढण्याची जबाबदारी दिली जाते. ज्यासाठी ती हे काम एका मित्राच्या मदतीने करते. 

 सूत्रांनी पुढे सांगितलय की, "विशाल भारद्वाज यांनी अगाथा क्रिस्टींच्या नॉवेलमधून एका काल्पनिक दुनियेची निर्मिती केली आहे. त्यांनी या पुस्तकाला वेगळ्या पद्धतिने समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात एका तरुण जोडीची कथा आहे जे जगाला बुद्धिमत्ता आणि आकर्षकतेसोबत पाहत आहेत. भारद्वाज सध्या स्क्रिप्टला टच देत आहेत. ज्यासोबत ते आलियाला शेवटचं नरेशन ऐैकवतील."

सध्या आलिया ही संजय लीला भंसाळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी'साठी मुंबईत शूटिंग करत आहे. यानंतर अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र'ची बाकी दोन गाणी आणि एसएस राजामौलीच्या पैन-इंडिया फिल्म 'आरआरआर'साठी काम करेल. याशिवाय आलिया ही शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली अभिनेता विजय वर्मासोबत एका डार्क कॉमेडी सिनेमातही दिसेल. याचं चित्रीकरण पुढील वर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. 

Recommended

Loading...
Share