By  
on  

अली अब्बास जफरच्या वेब सिरीजमध्ये दिसणार सैफ अली खानचा 'तांडव', उद्या टीझर होणार रिलीज

'सेक्रेड गेम्स' या सिरीजच्या यशानंतर आता सैफ अली खान एका राजकारणी थ्रिलरमध्ये दिसणार आहे. 'तांडव' असंं या वेब सिरीजचं नाव आहे. अली अब्बास जफरने या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या सिरीजच्या मेकर्सनी या सिरीजचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला आहे. 

या पोस्टरमध्ये एक नेता दिल्लीच्या राष्ट्रपती भवनाबाहेर विरोध प्रदर्शन करताना दिसत आहे. या व्यक्तीने नेहरु जॅकेट परिधान केला आहे. ही पाठमोरी उभी असलेली व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेता सैफ अली खान आहे. या सिरीजमध्ये सैफ एका युवा नेत्याच्या भूमिकेत आहे. 17 डिसेंबर रोजी या सिरीजचा टीझर प्रदर्शित होणार आहे. 

 

अमेझॉन प्राईमच्या ऑफिशियल सोशल मिडीया अकाउंटवर हा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये लिहीलं आहे की "तयार रहा, आपण तांडव मोडमध्ये प्रवेश करत आहोत. या सिरीजमध्ये सैफसोबतच गौहर खान, डिंपल कपाडिया, सारा जेन डायस, सुनील ग्रोवर आणि अमायरा दस्तूर हे कलाकार देखील आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive