या सिनेमातून होतोय सुनील शेट्टीचा मुलगा अहानचा बॉलिवुड डेब्यू, फर्स्ट लुक प्रदर्शित

By  
on  

अनेक सेलिब्रिटींची मुलं आता बॉलिवुडमध्ये येऊ पाहतायत. यात आता आणखी एक नाव सहभागी झालं आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीदेखील आता बॉलिवुड डेब्यू करतोय. 'तडप' या आगामी सिनेमातून त्याचा बॉलिवुड डेब्यू होत आहे. नुकतेच या सिनेमाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. एका पोस्टरमध्ये अहान त्याची कोस्टार तारा सुतारियासोबत दिसतोय. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तो बाईकवर दिसतोय. 

या पोस्टर्समध्ये अहानचा अँग्री यंग मेन लुक पाहायला मिळतोय. सुनील शेट्टीचीदेखील सिनेसृष्टीत अँग्री यंग मेन अशी ओळख होती. तेव्हा त्यांचा मुलगाही त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय. एवढच नाही तर सुनील शेट्टीचा खास मित्र खिलाडी अक्षय कुमारने सोशल मिडीयावर अहानचे दोन्ही पोस्टर लाँच केले आहेत. 

 

या सिनेमात अहान शेट्टीसोबत तारा सुतारियाही झळकतेय. जिने दोन वर्षांपूर्वी बॉलिवुडमध्ये एन्ट्री केली होती. तेव्हा अहान आणि ताराची ही फ्रेश जोडी आता नव्या प्रेमकथेसह पाहायला मिळणार आहे. साजिद नाडियाडवालाच्या 'तडप' या सिनेमातून अहानच्या करियरची सुरुवात होत आहे. याशिवाय सुनील शेट्टीलाही साजिद नाडियाडवालाच्या प्रोडक्शन कंपनीने लाँच केलं होतं. 

 

 'तडप' या मिलन लूथरिया दिग्दर्शित या सिनेमात अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी झळकणार आहेत.  24 सप्टेंबर रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share