सलमान खानची मोस्ट अव्हेटेड फिल्म राधेच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच या सिनेमाचा धमाकेदार पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे. सलमानने त्याच्या चाहत्यांना ईदचं गिफ्ट देत प्रभु देवा दिग्दर्शित या एक्शन-ड्रामा सिनेमाची रिलीज तारीख सांगीतली आहे. हा सिनेमा आता 13 मे, 2021 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली.
या सिनेमाची घोषणा करत सलमान खानने सोशल मिडीयावर हे नवं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. सलमान या पोस्टमध्ये लिहीतो की, "ईदची कमिटमेंट होती. ईदलाच येणार कारण जर एकदा मी..." या सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये सलमान खान हातात बंदुक घेऊन एका डॅशिंग एक्शन लुकमध्ये दिसत आहे. या सिनेमात सलमानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ आणि गौतम गुलाटी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
झी स्टुडिओचे सीबीओ शारिक पटेल याविषयी म्हणतात की, "आम्ही सलमान खानच्या या सिनेमाच्या माध्यमातून सिनेमागृहात प्रेक्षकांना पुन्हा आणण्यासाठी उत्साहित करु कारण त्यांच्या फिल्म्स उत्सवाचे वातावरण घेऊन येतात. ही 2021ची सगळ्यात मोठी फिल्म असेल आणि आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्सुक आहोत. मला विश्वास आहे की कठिण वर्षानंतर आता चाहत्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण असेल. राधे योर मोस्ट वॉटेंड भाई, सलमानच्या चाहत्यांसाठी आणि सिनेमाप्रेमींसाठी एक परफेक्ट ईद असेल. "
तर सलमान खान फिल्म्सचे प्रवक्ते सांगतात की, "सलमान खान आणि ईदचं एक स्पेशल कनेक्शन आहे. सलमान खान फिल्म्समध्ये राधे: योर मोस्ट वांटेड भाई सोबत या परंपरेला पुढे घेऊन जायला आम्हाला आनंद होत आहे. आम्ही टाळ्या, शिट्या आणि हाऊसफुलच्या युगाला पुन्हा परत आणण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यासाठी सलमानच्या फिल्म्स ओळखल्या जातात. आम्हाला राधेसाठी झी स्टुडिओसोबत सहयोग करताना आनंद होत आहे. सोबत मिळून आम्ही हा प्रयत्न करू की हा सिनेमा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि ते सुरक्षिततेची काळजी घेऊन याचा आनंद घेऊ शकतील."