By  
on  

वाढदिवसाला आलियाने फॅन्सला दिलं सरप्राईज, 'RRR' मधील सीताचा लुक आला समोर

एस एस राजमौलीचा सिनेमा  'आरआरआर' मधील आलियाभट्टचा फर्स्ट लुक आता समोर आला आहे. या सिनेमात आलिया सीताच्या भूमिकेत दिसणार आहे. सीताच्या लुकमधील आलियाचा लुक आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या लुकमध्ये सीता हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. 

या सिनेमाच्या मेकर्सनी सोशल मिडीयावर आलिया भट्टचा लुक प्रदर्शित केला आहे. शिवाय आलियानेही तिच्या सोशल मिडीया हँडलवर हा लुक पोस्ट केला आहे. आलियाच्या वाढदिवसानिमित्ताने हा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात साऊथ स्टार राम चरण सीताराम राजूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर एनटीआर जूनियर कोमाराम भीमच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय बॉलिवुड स्टार अजय देवगणचीही यात महत्त्वाची भूमिका पाहायला मिळेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt ️ (@aliaabhatt)

 

'आरआरआर' हा एक पीरिडय ड्रामा आहे. स्वातंत्र्य सेनानी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीमवर आधारित ही कहाणी. या सिनेमातून आलिया तेलुगू सिनेमात पाऊल ठेवत आहे.  13 ऑक्टोबर 2021 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive