By  
on  

पाहा Video : आमिर खानने सांगितलं सोशल मिडीया सोडण्याचं हे महत्त्वाचं कारण

बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 14 मार्च रोजी 56 वाढदिवस पार पडला. या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच आमिरने सोशल मिडीया सोडण्याचा निर्णय घेतला. याविषयीची घोषणा त्याने सोशल मिडीयावर केली. 15 मार्च रोजी आमिरने एक स्टेटमेंट सोशल मिडीयावर पोस्ट केलं आणि सांगितलं की तो आता ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय राहणार नाही. 

नुकतच पापराजीने आमिरला गाठलं. त्यावेळी आमिरने सोशल मिडीया सोडण्याचं कारण मिडीयाला सांगितलं. एका फोटोग्राफरशी बोलताना आमिर म्हटला की तो सोशल मिडीयावर जास्त सक्रिय नव्हता म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. आता मिडीयाच्या माध्यमातून तो त्याचे प्रेक्षक आणि चाहत्यांशी संवाद साधणार आहे. याशिवाय आमिर म्हणतो की, "तुम्ही तुमची थेअरी लावू नका. मी माझ्या धुंदीत असतो. सोशल मिडीयावर मी आहे तरी कुठे ? मला वाटलं की तसही मी जास्त काही पोस्ट करत नाही. पण हा अलविदा नाही. मी इकडेच आहे. कुठे जात नाही. आपण याआधीही बोलत होतो. आता यात मिडीयाचा रोल वाढला आहे. आता मी मिडीयाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी बोलू शकेल."

आमिरने सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमधून त्याच्या चाहत्यांना प्रेम आणि सहकार्यासाठी धन्यवाद केलं आहे. पोस्ट शेयर करत आमिरने लिहीलंं आहे की, "मित्रांनो माझ्या वाढदिवसाला दिलेल्या प्रेमासाठी सगळ्यांचे धन्यवाद. मला भरुन आलं आहे. दुसरी गोष्ट अशी की सोशल मिडीयावर ही माझी शेवटची पोस्ट आहे. तसही मी सक्रिय नाही. आपण याआधीसारखं बोलत राहूच."

 यावर्षी आमिर ख्रिसमसला 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. लॉकडाउनमुळे या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण होऊ शकलं नाही. म्हणून यावर्षी ख्रिसमसला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive