By  
on  

Thalaivi Trailer: अभिनेत्री ते राजकारणी जयललितांच्या बायोपिकमध्ये कंगणा बनली आयकॉनिक लीडर

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा रनौतची मोस्ट अवेटेड फिल्म थलायवी चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही फिल्म 23 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. ट्रेलरला कंगणाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये प्रसिद्ध राजकारणी जयललिता यांचा सुपरस्टार अभिनेत्री ते आयकॉनिक लीडर असा प्रवास दाखवण्यात आला आहे.

 ट्रेलरच्या सुरुवातीला बॅकग्राउंडमध्ये एक आवाज ऐकायला मिळतो की "वो फिल्म वाली बताएगी की हमको राजनीति कैसे करनी है". त्यानंतर कंगणाची झलक पाहायला मिळते. ज्यात विविध सीन दाखवण्यात आले आहेत. जयललिता यांच्या रुपात कंगणाचा लुक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. अभिनेत्री ते राजकारणी असा त्यांचा प्रवास या सिनेमात कंगणा साकारतेय. 

 

जयललिता यांनी अभिनय क्षेत्रात काम करत असताना राजकारणात कशी उडी घेतली हे देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे. राजकारणात येण्याआधी जयललिता या अभिनेत्री होत्या. या सिनेमात जयललिता साकारण्यासाठी कंगणाला तिचं वजन वाढवावं लागलं होतं. ट्रेरलमध्ये दाखवल्याप्रमाणे कंगणा जया ही भूमिका साकारत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive