By  
on  

'थलायवी'च्या ट्रेलर लाँचला कंगणाने केलं साउथ इंडस्ट्रीचं कौतुक, म्हटली "साउथ इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम आहे पण ग्रुपिझम नाही"

नुकतच 'थलायवी' या कंगणा रनौतच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कंगणाच्या वाढदिवसाच्या दिवशी हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यासोबतच नुकतच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. ज्यात कंगणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला. या सगळ्या गोष्टी होत असतानाच नुकतच मुंबईत 'थलायवी' सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी कंगणासह या सिनेमाची टीम उपस्थित होती.

यावेळी या सिनेमात काम करण्याच्या अनुभवाविषयी कंगणा बोलली. याशिवाय साउथ फिल्म इंडस्ट्रीचं कौतुक करतानाही ती दिसली. नेपोटीझम विषयी कंगणा अनेकदा बोलली आहे. यावेळीही ती याविषयी बोलली. साउथ इंडस्ट्रीमध्येही नेपोटीझम असल्याचं तिने सांगीतलं. पण एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली. ती म्हणजे ग्रुपिजम. ती म्हणते की, "साउथ इंडस्ट्रीमध्ये नेपोटीझम आहे पण ग्रुपिझम नाही. इथे न्यूकमर्सला दूर केलं जात नाही. इथे तुम्हाला आउटसायडर असल्याची फिलिंग येत नाही. इथे सगळे कठिण परिश्रम करतात आणि टॅलेंटची कदर केली जाते. कुणीही कुणाविषयी वाईट बोलत नाही. इथे फक्त काम आणि टॅलेंट आहे." 

 

यासोबतच कंगणाने 'थलायवी' चे दिग्दर्शक विजय यांंचं कौतुक केलं. ती म्हणते की, "मला आज सगळ्यांना सांगायचं आहे की विजय ही एक अशी व्यक्ति आहेत ज्यांनी मला माझ्या टॅलेंटसाठी चांगली जाणीव करुन दिली. विशेषकरून ज्या पद्धतिने ते मेल एक्टर्ससोबत वागतात तसं अभिनेत्रींसोबत वागत नाही. मी त्यांच्याकडून हे शिकली आहे की एक्टरला कशा पद्धतिची वागणुक दिली पाहिजे आणि कशा पद्धतिने क्रिएटीव्ह पार्टनरशीप दाखवली पाहिजे."

 'थलायवी' हा सिनेमा प्रसिद्ध लीडर जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. जयललिता यांचा अभिनेत्री ते एक राजकारणी लीडर असा प्रवास या सिनेमात कंगणा साकारतेय.

Recommended

PeepingMoon Exclusive