By  
on  

आमिर खानची कोरोना चाचणी पॉजिटिव, सध्या होम क्वारंटाइन

सध्या देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. एकीकडे मनोरंजन विश्वाचं काम सुरळीत सुरु असतानाच कोरोनामुळे कलाकारांनाही पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. यातच परफेक्शनिस्ट आमिर खानला कोरोना झाल्याची बातमी समोर येत आहे. आमिरची कोरोना चाचणी पॉजिटिव आली आहे. ज्यामुळे आमिरला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

आमिरच्या प्रवक्ताने याविषयी स्टेटमेंट प्रदर्शित केलं आहे. यात लिहीलय की, "आमिर खानची कोरोना चाचणी पॉजिटिव आली आहे. तो सगळ्या नियमांचं पालन करत आहे. आणि आता घरात होम क्वारंटाई झाला आहे. आमिरची प्रकृती आता ठीक आहे. सध्याच्या दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी ही विनंती. तुम्हा सगळ्यांचा आशिर्वाद आणि काळजीसाठी धन्यवाद."

 तर नुकतच अभिनेता कार्तिक आर्यनचीही कोरोना चाचणी पॉजिटिव आली होती. कार्तिक हा तब्बू आणि कियारासोबत  'भूल भुलैया 2' ची शूटिंग करत होता. कार्तिकने सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. 

Recommended

PeepingMoon Exclusive