By  
on  

आमिर खान, आर माधवननंतर आता फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणला कोरोनाची लागण

सध्या देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळतय. यंदा 2021 या वर्षीही कोरोनाचा संसर्ग पाहायला मिळतोय. यातच मनोरंजन विश्वात कोरोनाचा फैलाव वाढताना दिसतोय. अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता अभिनेता आर माधवनची कोरोना चाचणी पॉजिटिव आल्याचं समोर आलय. आर माधवनने त्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगत सोशल मिडीयावर एक मजेशीर पोस्ट शेयर केली आहे. '3 इडियट्स' सिनेमाची आठवण करून देत ऑल इज वेल म्हणत त्याने या सिनेमातील आमिरसोबतचा फोटो शेयर केला आहे. 

माधवन लिहीतो की, "फरहानने रँचोला फॉलो केलं आहे आणि व्हायरस नेहमी आमच्या मागे असायचा यावेळी मात्र त्याने आम्हाला पकडलं आहे. पण ऑल इज वेल आणि कोविड लवकर बरा होईल. ही एक अशी जागा आहे जिथे आम्हाला राजू नकोय. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद. मी माझ्या प्रकृतीची काळजी घेत आहे. "

 

तर फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंद सोमणची कोरोना चाचणीही पॉजिटिव आली आहे. मिलिंदने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयी माहिती दिली. शिवाय सध्या क्वारंटाईन असल्याचही सांगीतलं. मिलिंद सोमणने ट्विटमध्ये लिहीलं की, "चाचणी पॉजिटिव आले आहे, क्वारंटाईन आहे."

 

Recommended

PeepingMoon Exclusive