.jpg)
हरहुन्नरी अभिनेते ऋषी यांनी मागील वर्षी इहलोकाचा प्रवास संपवला. 30 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील रुग्णालयात ऋषि कपूर यांनी शेवटचा श्वास घेतला होता. अभिनेत्री नीतू कपूर अनेकदा ऋषी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या जोडीच्या केमिस्ट्रीचे फॅन आजही आहेत.
नीतू यांनी एक व्हिडियो शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ‘झूठा ही सही’ चित्रपटातील ‘जीवन के हर मोड पे’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना ऋषी कपूर दिसत आहेत. त्यानंतर नीतू यांनी काही दिवसांपूर्वी इंडियन आयडलच्या सेटवर देखील तोच किस्सा सांगितला होता हे दाखवण्यात आले आहे. इंडियन आयडॉल 12च्या सेटवर यावेळी नीतू कपूर यांनी हजेरी लावली आहे. ऋषी यांच्या निधनानंतर नीतू यांनी पहिल्यांदाच कोणत्यातरी मंचावर हजेरी लावली आहे.