By  
on  

चक्क या हॉलिवुड स्टारने चोरला शरद केळकरचा लुक ? शरद म्हणतो "हे सहन नाही होणार"

बॉलिवुडसह हॉलिवुड स्टारही त्यांच्या सिनेमांसाठी विविध लुक करताना दिसतात. एखादा सिनेमा करताना त्या भूमिकेसाठी तसा वेगळा लुकही करावा लागतो. हॉलिवुड स्टार जेसन स्टॅथमचा बाल्ड लुक हा कायम चर्चेत असतो. मात्र या लुकवरही तो विविध प्रयोग करताना दिसतो. 'हॉब्स एंड शॉ' या त्याच्या सिनेमात त्याचा गॉगल लुक पाहायला मिळतोय. मात्र त्याने हा लुक बॉलिवुड स्टार शरद केळकरला पाहुन केल्याचं स्वत: शरद म्हणतोय. 

नुकतच शरद केळकरने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शरद केळकरचा नवा लुक पाहायला मिळतोय. शरद केळकरने या नव्या लुकसाठी टक्कल केलं आहे. हलकी दाढी आणि गॉगल असा हा त्याचा नवा लुक आहे. मात्र शरदने त्याच्या या लुकची तुलना थेट जेसन स्टॅथमच्या लुकसोबत केली आहे. फक्त तुलनाच नाही तर चक्क जेसनने शरदचा हा लुक चोरऱ्याचं शरद म्हणतोय. शरदची ही एक गमतीशीर पोस्ट आहे. शरद या पोस्टमध्ये लिहीतो की, "मी तुला माझा आवाज दिला आणि तू माझा लुक चोरला, हे सहन नाही."  

 

जेसनचा सिनेमा 'हॉब्स एंड शॉ'च्या हिंदी वर्जनसाठी शरदने जेसनच्या कॅरेक्टरला व्हॉईस ओव्हर म्हणजेच आवाज दिला आहे. आणि याच निमित्ताने शरदने त्याचा लुक आणि जेसनच्या लुकची तुलना करत सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने दोघांचे एकत्र फोटो शेयर केले आहे. सोशल मिडीयावर या पोस्टला पसंत केलं जातय. जेसन स्टॅथमचे हॉलिवुडसह भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. शरदही त्याचा फॅन असल्याचं यातून पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive