By  
on  

'महाभारत'मध्ये इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनाने निधन

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचं निधन झालं आहे. 10 एप्रिल, 2021 रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश हे बऱ्याच काळापासून आजारी होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेत त्यांनी इंद्रदेवाची भूमिका साकारली होती. बऱ्याच कालावधी पासून त्यांची आर्थिक परिस्थितीही बिकट होती. त्यांच्याकडे औषधे आणि इतर सामानासाठी देखील पैसे नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची प्रकृती अस्थिर होती. मात्र कोरोनाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सतीश यांनी हिंदीसह पंजाबी सिनेमांमध्येही काम केलं होतं. त्यांनी जवळपास 300 हिंदी आणि पंजाबी सिनेमे केले होते. देव आनंद, दिलीप कुमार, शाहरुख खान या कलाकारांसोबतही त्यांनी काम केलं होतं. 'सस्सी पन्नू', 'इश्क निमाना', 'सुहाग चुडा', 'पटोला' हे त्यांचे प्रसिद्ध सिनेमे आहेत. 2011 मध्ये त्यांना पीटीसी पंजाबी फिल्म पुरस्कार सोहळ्या पंजाबी सिनेमांमधील त्यांच्या कारकिर्दीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

 अशोक पंडित यांनी सतीश यांच्या निधनाची बातमी ट्विटरवर दिली आहे. ते लिहीतात की, "हिंदी आणि पंजाबी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांच्या निधनाच्या बातमीने दु:ख होत आहे. लुधियानामध्ये कोविड 19 मुळे त्यांचं निधन झालं. ते बराच काळ आजारी होते.  त्यांचा परिवार आणि निकटवर्तीयांसाठी मी मनापासून शोक व्यक्त करतो."

 .

 

Recommended

PeepingMoon Exclusive