By  
on  

काजोलची मुलगी नायसा आली तारुण्यात, काजोल म्हणते "तू जेव्हा जन्माला आली तेव्हा मी खूप चिंतेत होते"

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांना दोन मुलं आहेत. एक मोठी मुलगी नायसा आणि लहान मुलगा युग. त्यात मोठी मुलगी नायसा नुकतीच 18 वर्षांची झाली आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने काजोलने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये काजोलने नायसाच्या लहानपणीचा फोटो शेयर केला आहे. नायसा जन्माला आली तेव्हा काजोल कोणत्या चिंतेत होती याविषयी ती या पोस्टमध्ये लिहीते. मात्र नायसा जशी मोठी होत गेली तसं काजोल विविध गोष्टी शिकू लागली असल्याचं त्यात म्हणतेय. नायसाला 18 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी खास पोस्ट काजोलने शेयर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

 

या पोस्टमध्ये काजोल लिहीते की, "तू जेव्हा जन्माला आली तेव्हा मी खूप चिंतेत होते. ती माझी सगळ्यात मोठी परिक्षा होती आणि ती सगळी भिती आणि भावना त्यासोबत पूर्ण वर्षभर होती. मग तू 10 वर्षांची झाली आणि मला लक्षात आले की मी शिक्षक होते तर काही वेळा मी विद्यार्थी होती जी गोष्टी करण्यासाठी आणि त्याकडे पाहण्यासाठी विविध मार्ग शिकत होती. आणि आज आपण इथपर्यंत आलोय, आता मी अखेर बोलू शकते की मी हे यशस्वीरित्या पास झाली आहे. महिलेने उंच झेप घेतली पाहिजे माझी डार्लिंग आणि तुझी चमक कुणासाठीही कमी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. तारुण्याच्या शुभेच्छा. तुझ्याकडे साधनं आहे त्याचा योग्य तो वापर कर."

या शुभेच्छांसह एक खास सल्लाही काजोलने मुलीला दिला असल्याचं पाहायला मिळतय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

तर वडील अजय देवगणनेही मुलगी नायसाला शुभेच्छा देणारी पोस्ट शेयर केली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive