By  
on  

इरफान खान आणि भानू अथैया यांना ऑस्करनं दिली आदरांजली

नुकताच ऑस्कर 2021 सोहळा पार पडला. दरवर्षी या सोहळ्यात सिनेसृष्टीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहिली जाते. यंदाही काही भारतीय दिवंगत कलाकारांचा यात समावेश होतो. अभिनेते इरफान खान आणि भानू अथैया यांना यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली. यात जागतिक कलाकारांच्या यादीत अभिनेता इरफान खान आणि वेशभूषाकार भानू अथैया यांचाही समावेश पाहायला मिळाला.

भानू अथैया या ऑस्कर पटकावणाऱ्या भारतातील पहिल्या कलाकार होत्या ज्यांना गांधी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तर मागील वर्षी 2020 मध्ये अभिनेता इरफान खाननेही जगाचा निरोप घेतला. बॉलीवडुसह हॉलिवुडच्याही अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये इरफानने काम केलं आहे. इरफानच्या निधनाने हिंदी सिनेविश्वासह हॉलिवुडवरही शोककळा पसरली होती. 

मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत,ऋषी कपूर, सरोज खान, एस.सुब्रमण्यम, आशालता वाबगावकर यासारख्या दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला होता. या कलाकारांची नावं ऑस्करच्या यादीत नसली तरी इरफान खान आणि भानू अथैया या कलाकारांना ऑस्करने श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive