By  
on  

'राधे' सिनेमाचं नवं गाणं 'सिटी मार' प्रदर्शित, दिशा पाटनीसोबत असा थिरकला सलमान खान

‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमातील 'सिटी मार या गाण्याची सलमानच्या चाहत्यांना उत्सुकता होती. नुकतच हे गाणं प्रदर्शित करण्यात आलय. सलमान खानने हा बहुप्रतीक्षित डांस नंबर प्रदर्शित केला असून प्रत्येक चित्रपटात सलमानच्या आइकॉनिक गाण्यांचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता, ‘सिटी मार’ पहिल्यापासूनच या वर्षीचा सर्वात मोठा चार्टबस्टर बनण्याच्या मार्गावर दिसतोय.

हे गाणं कमाल खान आणि लुलिया वंतूरने गायले असून शब्बीर अहमदने हे गाणं लिहिलय. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता.  सलमानच्या प्रत्येक गाण्यात त्याची एक सिग्नेचर डान्स स्टाईल असते. याही गाण्यात अशा विविध हटके स्टेप्स पाहायला मिळत आहेत. शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाचं दिग्दर्शन याला लाभलं आहे. जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे मिश्रण या गाण्यात सादर केले आहे. स्लो मोशन मे या गाण्यानंतर आता पुन्हा एकदा सलमान आणि दिशा पाटनी ही जोडी या गाण्याच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. सिटी मारची हुक स्टेप ही लक्षवेधी ठरतेय. 

 

 तेव्हा ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या सिनेमातून या वर्षी ईदला सलमाकडून प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार असं चित्र दिसतय.सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील प्रदर्शित करण्यात येत आहे.. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म हे डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवी वर देखील उपलब्ध असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive