By  
on  

कंगणा रनौतचं ट्विटर अकाउंटर करण्यात आलं सस्पेंड, केले होते वादग्रस्त ट्विट्स

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा रनौत कायम विविध गोष्टींसाठी चर्चेत आणि वादात असते. कंगणाने सोशल मिडीयावर एन्ट्री केल्यापासून तिचे वादग्रस्त ट्विट्स आणि पोस्ट चर्चेत असतात. आता पुन्हा तिच्या ट्विटमुळे ती वादात सापडली आहे.

कंगणाने नुकत्याच केलेल्या ट्विट्समुळे तिने नियमांचं उल्लंघन केलं आणि म्हणूनच तिंच ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलय. मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांविरुद्ध ट्विट पोस्ट केल्याने कंगणाचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आलय. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्मिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगणा ट्विटच्या माध्यमातून भाष्य करत होती. मात्र यंदा हे वादग्रस्त ट्विट कंगणाला महागात पडले आणि तिचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं.

आता ट्विटरवर कंगणाचं प्रोफाईल पाहिल्यास काही दिसत नसून तिचे ट्विट्सही काढून टाकण्यात आले आहेत. कंगणा ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही विविध पोस्ट करत असते. यातही बऱ्याच वादग्रस्त गोष्टी आढळून येतात. तेव्हा तिचं इन्स्टाग्राम अकाउंटही सस्पेंड करण्यात येईल की काय अशीही चर्चा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive