नेहा पेंडसे ‘भाभीजी घर पर है’ मधून बाहेर? नेहाने केला खुलासा

By  
on  

बोल्ड आणि ब्युटीफुल नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे.  या मालिकेतील अनिता भाभी ही व्यक्तिरेखा यापुर्वी सौम्या टंडन साकारत होती. पण तिने मालिका सोडल्यानंतर  मालिकेत  अनिताच्या व्यक्तिरेखेसाठी नेहाची वर्णी लागली. नेहाने क्रुला जॉईन केल्यावर तिचं जंगी स्वागतही करण्यात आलं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

पण नेहा मालिकेतून बाहेर पडल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. यावर नेहा म्हणते, ‘गेले काही दिवस मी मालिकेत दिसत नसल्याने मी मालिका सोडल्याची चर्चा होत आहे. पण मी सांगू इच्छिते की,  प्रदर्शित करण्यात आलेले हे भागं जुने आहेत आणि मी त्या चित्रीकरणाचा भाग नव्हते. 
जेव्हा हे एपिसोड प्रदर्शित करण्यात आले तेव्हा अनेकांनी मला मेसेज करून माझ्या व्यक्तिरेखेची आठवण येत आहे सांगितलं. मी त्यांना समजावून सांगितलं की मी परत येणार आहे. मला ती भूमिका साकारायला आवडतं. मी त्या मालिकेचा भाग आहे. या मालिकेचं शुटिंग सध्या सुरतमध्ये सुरु आहे.

Recommended

Loading...
Share