अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख सोशल मिडीयावर चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसतात. एवढच काय तर दोघांची दोन गोंडस मुलंही त्यांच्या सोशल मिडीयावर झळकतात. रितेशने नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केलाय. हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.
रितेश आणि जेनेलियाला रियान आणि राहिल अशी दोन गोंडस मुलं आहेत. त्यापैकी राहिलच्या वाढदिवसानिमित्ताने रितेशने खास पोस्ट केली आहे. या व्हिडीओत रितेश मुलगा राहिलसोबत दिसतोय. जिथे मुलाला जवळ झोपवून रितेश त्याच्यासाठी गाणं गातोय. "तेरा मुझसे है पेहले का नाता कोई.. " हे गाणं रितेश गातोय.
या पोस्टमध्ये रितेश लिहीतो की, "यापेक्षा कोणताच मोठा आनंद नाही. माझ्या प्रिय मुला, दररोज सकाळी तुझं डोकं माझ्या छातीवर असतं आणि मी तुझ्यासाठी गातो. मी इच्छा व्यक्त करतो की मी कदाचित वेळ थांबवू शकलो असतो. मला हे अजीबात आवडत नाहीय की तो खूप वेगाने मोठा होत आहेस. पण मला हे देखील आवडतय की तू छान लहान माणूस बनतोय. विनाअटीचं प्रेम काय असतं हे तू मला दररोज शिकवतोय. माझा रायो. मी माझ्या खूपसाऱ्या प्रेमाच्या शुभेच्छा तुला देतो. आनंद, उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा राहिल."