By  
on  

शरद केळकरने स्ट्रगलिंग काळातील या गोष्टींचा केला खुलासा, "बँकबॅलेन्स तर नव्हताच शिवाय कर्जबाजारी झालो होतो.."

एखादा स्टार घडण्यामागे बरीच मेहनत आणि कष्ट असतात. ती व्यक्ति स्टार बनण्यामागे मोठा संघर्षही असतो. याविषयी अनेकांना माहिती नसते. असाच संघर्षातीला काळाचा खुलासा अभिनेता शरद केळकरने केला आहे. एका टॉक शोमध्ये बोलताना शरद केळकरने मनीष पॉलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या संघर्षाची कहाणी सांगितलीय.

शरद केळकरने अनेक हिंदी मालिका, मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केलय. त्याच्या वैविध्यपूर्ण कामासाठी त्याची ओळख आहे. हिंदी सिनेसृष्टीतील उत्तम कलाकारांपैकी एक अशी ओळख असलेल्या शरद केळकरच्या आयुष्यातही सुरुवातीच्या काळात संघर्ष असल्याचं तो या मुलाखतीत सांगतो. "लोकं काम बघतात पण त्या कामाच्या मागचा स्ट्रगल कुणीही बघत नाही." अशी खंत शरदने या मुलाखतीत व्यक्त केली आहे. 

 

मनीष पॉलने घेतलेल्या मुलाखतीच्या प्रोमोमध्ये शरद या गोष्टी शेयर करताना दिसतोय. कलाकारांचं काम लोकांना माहिती असतं पण त्यामागचा स्ट्रगल कुणालाही दिसत नसल्याची खंत शरदने यावेळी सांगितली. तो पुढे म्हणतो की, "मी ग्वालियारमधून आलोय. लोकांना वाटतं की यांच्याकडे मर्सिडीज आहे, चांगले कपडे घालतात, केस वैगेर चकाचक बनवून येतात पण लोकांना बॅकस्टोरी माहिती नसते. माझ्या आयुष्यात असही झालय की अशी वेळ आली होती जेव्हा बँक बॅलेन्स नव्हताच पण माझे क्रेडिट कार्डही संपले होते, डोक्यावर कर्जही होतं."

शरदने आत्तापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांमधून तो एक उत्तम अभिनेता असल्याचं सिद्ध केलय. 'बाहुबली' सारख्या लोकप्रिय सिनेमाच्या हिंदी वर्जनसाठी आवाज देणं असो किंवा 'लक्ष्मी' सिनेमातील तृतीयपंथीयाची भूमिका किंवा 'तान्हाजी' सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो शरदने त्याच्या कामातून प्रेक्षकांना चकीत केलय. आगामी काळात 'देजा वू' सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive