बॉलिवूडची बेबो म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री करिना कपूर खानचा आज वाढदिवस आहे. अनेक विविध सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी करिना आज 38 वर्षांची होत आहे. ‘अशोका', 'चमेली', 'कभी खुशी कभी गम', 'देव', 'ओमकारा', 'डॉन', '3 इडियट्स', 'बॉडीगार्ड', 'तलाश', 'बजरंगी भाईजान', 'उड़ता पंजाब , वीरे दी वेडींग यांसारखे सुपरहिट सिनेमे करिनाच्या नावावर आहेत. चला, तर मग करिनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या टॉप 10 खास गोष्टी जाणून घेऊयात.
- करिना कपूरला सर्व कुटुंबिय लाडाने बेबो अशी हाक मारतात.
- करिनाने 2000 साली रेफ्यूजी सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
3.करिना प्रसिध्द अभिनेते रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची मुलगी आहे. 4.बॉलिवूडचा 80-90 चा काळ गाजवणारी सुप्रसिध्द अभिनेत्री करिश्मा कपूरची करिना कपूर ही धाकटी बहिण आहे. 5.सुप्रसिध्द कपूर कुटुंबात जन्मेलली करिनाचे ऋषी कपूर आणि नितू कपूर हे काका काकी आहेत. तर अभिनेता रणबीर कपूर तिचा चुलत भाऊ आहे. 6.करिना कपूरचे नाव यापूर्वी अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. तिचे काहींसोबत अफेअरही होते. सर्वप्रथम इंडस्ट्रीत आल्यावर ती फरदीन खानला डेट करत होती. खुशी सिनेमादरम्यान त्यांच्यात आधी मैत्री व मग प्रेम फुलले. 7.ऋतिक रोशनसोबतसुध्दा करिनाचे नाव अनेकवेळा घेण्यात आले. मै प्रेम की दिवानी हू हा दोघांचा शेवटचा सिनेमा. त्यानंतर दोघांचा कुठलाच सिनेमा झळकला नाही. कारण ऋतिकची पत्नी सुझान खानला या दोघांच्या गुफ्तगूची कुणकुण लागली होती. 8.अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर यांचं प्रेमप्रकरण बॉलिवूडमद्ये बरंच गाजलं. दोघांची खुप जवळीक होती. जब वी मेट सिनेमादरम्यान तर त्यांच्याबद्दलच्या अनेक चर्चांना उधाण आलं होतं. शाहिद-करिनाच्या किसचा एक व्हिडीओसुध्दा तेव्हा व्हायरल झाला होता. पण नंतर त्यांच्यात काहितरी बिनसलं आणि दोघं वेगळे झाले. 9.टशन सिनेमामुळे करिना कपूर आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यांची जवळीक वाढू लागली. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर करिनाने आपल्यापेक्षा 10 वर्षाने मोठ्य़ा असलेल्या सैफसोबत लग्न केलं. 10.करिना-सैफला तैमूर अली खान हा दोन वर्षांच मुलगा आहे. तो इतका गोड आहे, की आई वडिलांपेक्षा त्याचीच सध्या जास्त प्रसिध्दी होते.