By  
on  

सलमान खान ईदीबरोबरच फॅन्सना देणार ख्रिसमसचं खास गिफ्ट

सलमान खानचा सिनेमा म्हणजे चाह्त्यांसाठी एक पर्वणी असते तर निर्मात्यांसाठी १०० करोडच्या क्लबमध्ये घेऊन जाण्याची गॅरेंटी ठरते. बॉलिवूडच्या भाईजानच्या सिनेमांची सर्वांनाच प्रंचड उत्सुकता असते. कधी त्याचा सिनेमा प्रदर्शित होतो याकडे सर्व डोळे लावून बसलेले असतात.

बॉलिवूडच्या दबंग सलमानचा तिसरा सिक्वेल दबंग -३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सुपरहिट सिनेमाचा तिसरा सिक्वेल येतोय म्हटल्यावर चाहत्यांसाठी ही गुडन्यूजच आहे. पण प्रेक्षकांना या सिक्वेलसाठी जरा वाट पाहावी लागणार आहे. सूत्रांनुसार पुढील वर्षी २०१९ मध्ये ख्रिसमसनिमित्त सलमानचा दबंग -३ प्रदर्शित होणार आहे.

पुढचं वर्ष सलमान खानच्या चाहत्यांसाठी २०१९ खास ठरणार आहे. कारण २०१९ मध्ये त्याचे एक नाही तर तब्बल दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत सिनेमा हा सलमान फॅन्ससाठी ईदी ठरणार तर दंबग -३ ख्रिसमस गिफ्ट म्हणून मिळणार आहे.

दबंग -३ चं दिग्दर्शन प्रभू देवा करणार आहे. तर दबंगच्या पहिल्या दोन भागांचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि अरबाज खानने केलं होतं. सलमान खान सध्या भारत सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी असल्याने यंदा नोव्हेंबरमध्ये तो दबंग-३ च्या शूटींगला सुरुवात करणार आहे. प्रेक्षकांना दबं खानच्या सिनेमाची आतुरता

Recommended

PeepingMoon Exclusive