By  
on  

ही आहे ठग्स ऑफ हिंदुस्थानची रिलीज डेट,दिवाळीत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

यशराज फिल्म्सअंतर्गत प्रदर्शित होणारा यंदाचा बिग बजेट आणि आमिर खान व बिग बींची भूमिका असलेला ठग्स ऑफ हिंदुस्थान हा सिनेमा नोंव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे पिपींगमूनने तुम्हाला यापूर्वी एक्सक्ल्युझिव्हरित्या सांगितले होते. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख यशराज फिल्म्सच्या ट्विटर हॅंडलवर उलगडण्यात आली आहे.

आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या बहुचर्चित सिनेमाची प्रचंड उत्सुकता प्रेक्षतकांसोबतच संपूर्ण बॉलिवूडलाही लागून राहिली आहे. यंदाच्या दिवाळीत 8 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  मि. परफेक्शिन्स्ट आणि बिग बी यांच्यासोबतच सिनेमात कतरिना कैफसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. यशराज फिल्म्स प्रस्तुत  ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचा फर्स्ट लूक आज 17 सप्टेंबर रोजी म्हणजेच सोमवारी विश्वकर्मा पूजेच्या दिवशी लॉंच करण्यात आला आहे. तर ट्रेलर यश चोप्रा यांच्या वाढदिवशी म्हणजेच 27 सप्टेंबरला उलगडणार आहे.

https://twitter.com/yrf/status/1041560007144341504

ठग्स ऑफ हिंदुस्थान हा बॉलिवूडमधील बिग बजेट सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. एस एस राजा मौली यांच्या बाहुबली सिनेमात वापरण्यात आलेल्या मोठमोठ्या व्हिज्युअल इफेकट्सनंतर आता तशा प्रकारचे इफेकट्स आपल्याला या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहेत. विजय कृष्णा आचार्य दिग्दर्शित ठग्स ऑफ हिंदुस्थान हा सिनेमा हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येसुध्दा आयमॅक्स आणि 3D मध्ये पाहता येणार आहे.

ठग्स ऑफ हिंदुस्थान हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित असून दिवाळीत प्रेक्षकांसाठी हा सिनेमा एक पर्वणीच ठरणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive