By  
on  

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामची लोकप्रिय ‘स्त्री’!

बॉलिवूडमध्ये सध्या ‘स्त्री’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अनेक सिनेमांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा बिजनेस करणा-या ह्या सिनेमामूळे श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलिवूडची टॉप ट्रेंडिग अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, ‘स्त्री’ श्रध्दा कपूर डिजीटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे.

गेले काही दिवस निक-प्रियंका जोडीची डिजीटल विश्वात एवढी चर्चा होती की, प्रियंकाच गेले कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वत्र दिसत होती. पण ‘स्त्री’ चित्रपटातल्या दमदार परफॉर्मन्समूळे श्रध्दाने प्रियंकालाही लोकप्रियतेत मागे टाकलंय. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

डिजीटल विश्वात सध्या श्रध्दा आणि प्रियंका चोप्राशिवाय सुई धागा सिनेमामुळे अनुष्का शर्मा आणि आपल्या वेबसीरिजमूळे राधिका आपटेचा चाहतावर्ग खुप मोठा आहे. तसेच मणिकर्णिका सिनेमामुळे कंगना रनौतसूध्दा चांगलीच पॉप्यूलर बनलीय.

मात्र नंबर वन स्थानी पोहोचलेल्या श्रध्दाने 100 गुणांसह डिजीटल विश्वात ह्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकले आहे. डिजीटल लोकप्रियतेत श्रध्दानंतर प्रियंका चोप्रा 89 गुणांसह दुस-या स्थानावर, अनुष्का शर्मा 36 गुणांसह तिस-या जागी, राधिका आपटे 26 गुणांसह चौथ्या पदावर तर कंगना रनौत 23 गुणांसह पांचव्या क्रमांकावर आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “स्त्री सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे आणि सिनेमाला प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे श्रध्दा कपूरच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झालेली दिसून आली आहे. सिनेमा पाहिलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया आणि त्याविषयीच्या होणा-या इन्स्टा पोस्टमुळे श्रध्दा इन्स्टाग्रामवर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेच. शिवाय श्रध्दा सध्या ‘बत्ती गूल…’ ह्या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे आणि त्याविषयीही डिजीटलमाध्यमामध्ये लेख आणि पोस्ट सतत पाहायला मिळतायत. म्हणूनच डिजीटल आणि इन्स्टाग्राम या दोन्हीवर श्रध्दा अग्रेसर ठरलीय.”

Recommended

PeepingMoon Exclusive