By  
on  

अजय देवगण जेव्हा पत्नी काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर करतो तेव्हा...........

हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना....कारण बडे स्टार्स म्हटलं की त्यांच्यापर्यंत प्रसिध्दी माध्यमांनासुध्दा थेट पोहचता येत नाही तर सामान्यांची काय त-हा. या सुपरस्टार्सपर्यंत पोहचण्यासाठी नेहमीच पत्रकारांनासुध्दा जनंसपर्क कार्यालयाचा आधार घ्यावा लागतो. मुलाखतीसाठी त्यांचे मोबाईल नंबर किंवा मेसेजसाठीचा संपर्क कधीच सहज उपलब्ध होत नाही. पण इथे तर चक्क अभिनेता अजय देवगणने आपली पत्नी अभिनेत्री काजोलचा मोबाईल क्रमांक थेट ट्विटरवरुनच शेअर केला आहे.

https://twitter.com/ajaydevgn/status/1044190179467165696

ट्विरवरुन अजय देवगणने एक ट्विट केलं की, “काजोल सध्या देशाबाहेर असून तिच्याशी संपर्क साधायचा असेल तर तिच्यासोबत या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा.” अजयचं हे ट्विट पाहून सर्वच चकित झाले. काहींनी तर हा नंबर त्वरित ट्रू कॉलर आणि व्हॉट्सअपवर तपासला व तो काजोलचाच खरा नंबर असल्याचं निष्पन्न झालं. पण अजयने काजोलचा वैयक्तिक नंबर का जगजाहीर केला सर्वांना पडलेला मोठा प्रश्न. पण अजयने काजोलसोबत हा प्रॅंक खेळला होता. मुद्दामून त्याने तसं ते केलं होतं. पण अजयला हा प्रॅंक खेळणं चांगलंच महागात पडल्याचं दिसून येतंय.

https://twitter.com/ajaydevgn/status/1044247352603811841

काजोल या अजयच्या मस्करीमुळे चांगलीच खवळली तिला फार मनस्ताप सहन करावा लागला आणि तिने त्यासाठी सडेतोड उत्तर देत ट्विट केलं, “‘तुझे प्रँक्स आता स्टुडिओच्या बाहेरसुद्धा होऊ लागले आहेत. पण प्रॅंक खेळणा-यांना घरात प्रवेश नाह, हे ध्यानात ठेवा.”

https://twitter.com/KajolAtUN/status/1044433802666356736

अनेक ट्विटर यूजर्सनी तर अजयची या ट्विटवरुन जबरदस्त शाळाच घेतली तर काहींनी खिल्ली उडवली होती.

दरम्यान काजोलची प्रमुख भूमिका असलेला हेलिकॉप्टर ईला हा सिनेमा येत्या ऑक्टोबरमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive