नागराज मंजुळेच्या सिनेमात काम करतायत बिग बी, लवकरच सुरु होतंय शूटींग

By  
on  

सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे याचं कौतुक आणि अभिमान जितका मराठी सिनेसृष्टीला वाटतो तितकंच त्यांच्यासोबत काम करण्यास बॉलिवूडकरही उत्सुक असतात. नेहमीच मराठीसोबत कनेक्ट असणारा मि. परफेक्शिनिस्ट आमिर खाननेसुध्दा नागराज यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनीसुध्दा आपण नागराजसोबत काम करण्यास उत्साही असल्याचं सांगितलं होतं.

चाहत्यांसाठी आनंदाजी बातमी म्हणजे, लवकरच बिग बी नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन असेलला ‘झुंड’ या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार आहेत. मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून नागपुरात ‘झुंड’ सिनेमाचं शुटींग सुरू होणार आहे. तोपर्यंत बिग बी आपला टीव्ही शो कौन बनेगा करोडपती आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान सिनेमातून पूर्णपणे फ्री होतील. ते नागपूरमध्ये सलग 45 दिवस या सिनेमाचं शूटींग करणार अहेत. तसंच संपूर्ण सिनेमाच 70-80 दिवसात पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वीच बिग बींनी नागराज मंजुळेचा हा सिनेमा सोडल्याच्या बातम्या येत होत्या. यासाठी बिग बींनी आपल्याकडे तारखा नसल्याचं कारण दिल्याचं बोललं जात होतं. तसंच शुटींगसुध्दा वारंवार पुढे ढकललं गेल्याची माहिती देण्यात आली होती.

‘झुंड’ सिनेमात बिग बींसोबत काम करण्यास नागराज मंजुळेसुध्दा प्रचंड उत्सुक आहेत. ते स्वत: बिग बींचे खुप मोठे चाहते आहेत. त्यांच्या मते या सिनेमातील मुख्य भूमिकेला अमिताभ बच्चनच न्याय देऊ शकतील. एका केळ प्रशिक्षकाच्या भूमिकेत बिग बी आपल्यासमोर या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येतील.

सर्वांनाच आता बिग बी आणि नागराज मंजुळे हे समिकरण असलेल्या ‘झुंड’ सिनेमाची प्रचंड आतुरता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share