कृष्णा राज यांच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर यांच्याबरोबरच रणबीर,नितूसुध्दा उपस्थित राहणार नाही

By  
on  

कृष्णा राज कपूर यांच्या निधनाने संपूर्ण कपूर कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. त्यांच्या सांत्वनासाठी अवघं बॉलिवूड लोटलं असताना त्यांचा मुलगा ऋषी कपूर मात्र अनुपस्थित आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ऋषी कपूर यांच्यासोबतच त्यांची पत्नी नितू कपूर आणि मुलगा रणबीर कपूरसुध्दा उपस्थित राहणार नाहीत. कपूर कुटुंबातील हे सदस्य ऋषी यांच्या उपचारासाठी अमेरिकेत आहेत आणि उपचार अर्धवट टाकून ते परतू शकत नाहीत.

पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार ऋषी कपूर यांच्यासोबत परदेशी त्यांची पत्नी नितू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर आहे, त्यामुळे या दोघांनासुध्दा भारतात परतणे अशक्य आहे.

ऋषी कपूर यांनी ट्विट करुनच आपण अमेरिकेला उपचार घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सर्वांना दिली होती.“मी बॉलिवूडमध्ये गेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ घालवला आहे. येथेच मला तुम्ही भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे माझ्याविषयीची माहिती माझ्या चाहत्यांना मिळावी ही माझी इच्छा. मी काही दिवस वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होत आहे. कोणतीही काळजी करु नका. मी लवकरच भारतात परत येईन. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच.”

Recommended

Loading...
Share