By  
on  

आवाजाचे जादूगार चेतन सशितल 'ठाकरे'च्या डबिंगसाठी नवाजुद्दीनला करतायत मार्गदर्शन

आवाजाचे जादूगार, व्हॉईस अॅक्टर चेतन सशितल यांचं नाव आणि त्यांच्या आवाजाची अचंबित करणारी किमया विविध व्हिडीओद्वारे आपण अनुभवलीसुध्दा आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर या दिग्गजांचा आवाज ज्यांनी आपल्या गळ्यात सामावून घेतला आहे तेच प्रसिध्द व्हॉईस अॅक्टर चेतन सशितल हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकीला त्याचा आगामी आणि महत्त्वकांक्षी सिनेमा 'ठाकरे' च्या डबिंगसाठी मार्गदर्शन करतायत.

महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी चेतन सशितल यांनी 'बाळकडू' सिनेमातील काही दृश्यांसाठी हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवाज देऊन सर्वांनाच थक्क करुन टाकलं होतं. आता नवाजुद्दीन सिध्दीकीला बाळासाहेबांच्या आवाजातील बारकावे आणि त्यांच्या भाषणांतील मराठी माणसाला भारावून टाकणा-या आवाजाबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ते दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यासोबत डबिंग स्टुडिओत उपस्थित आहेत. या डंबिंग प्रोजक्टेवर काम करण्यासंदर्भातला एक फोटोसुध्दा त्यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

दरम्यान पिपींगमून मराठीने यांसदर्भात चेतन सशितल यांच्याशी ठाकरे सिनेमाच्या या डबिंगविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

https://www.instagram.com/p/Bogqet8AEAi/?taken-by=chetansashital

खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेला 'ठाकरे' या सिनेमाचा टिझर  गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत उलगडला होता.  बाळासाहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या २३ जानेवारी २०१९ रोजी 'ठाकरे' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive