By  
on  

साजिद खान माझ्यासोबत नेहमी अश्लिल चाळे करायचा;अभिनेत्री सलोनी चोप्राचा आरोप

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये जणू काही मी टू वादळच घोंघावू लागलं आहे. एकामागोमाग एक अनेक कलाकारांवर आरोप होताना पाहायला मिळतायत. आता या रांगेत आणखी दिग्दर्शक साजिद खानच्या नावाचा समावेश झाला आहे.

टीव्ही अभिनेत्री सलोनी चोप्रा, रेचल वाइट आणि एका महिला पत्रकाराने साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. साजिद खान कित्येक महिने आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं सलोनीचं म्हणणं आहे.

काय आहे सलोनी चोप्राची पोस्ट  

तो माझ्या आयुष्यातला इतका वाईट काळ होता, याचं मला आता वर्णन करतानासुध्दा दु:ख होत आहे. मी जेव्हा सर्वप्रथम साजिद खानकडे मुलाखतीसाठी गेले होते तेव्हा त्याने मला फार विचित्र आणि अश्लील प्रश्न विचारले. लैंगिकरित्या मी कशी आहृ? मला यात किती अनुभव हे असे प्रश्न त्याने विचारले. मला तेव्हा फार रडू आलं होतं, नंतर त्याने मला तो जॉब दिला. पण तो जे काम सांगायचा ते मला करावं लागायचं. तसंच कधीही वाटेल तेव्हा रात्री-अपरात्री फोन करुन मी खातेय आणि काय कपडे घातलेत यांसारखे विचित्र प्रश्न विचारायचा. नेहमीच अश्लील वर्तवणुक आणि गोष्टी करायचा.

साजिद अनेकदा माझ्याकडे अश्लिल फोटोंची मागणी करायचा. त्याच्यासोबत काम करत असताना अनेकदा तो मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा. तो माझ्यासमोर स्वत:चे कपडे उतरवायचा आणि त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करायला लावायचा. मला हे सर्व खुप किळसवाणं वाटायचं.

मी तेव्हा ब-याच मानसिक धक्क्यात होते. त्यातून सावरायला मला खुप वेळ लागला आणि या चळवळीच्या निमित्ताने मी आज याविरोधात आवाज उठवतेय.

Recommended

PeepingMoon Exclusive