By  
on  

धक्कादायक! सैफ अली खान म्हणाला, 25 वर्षांपूर्वी माझंही झालं होतं शोषण

 

बॉलिवूडमध्ये सध्या #MeToo मोहिमेचं एक जबरदस्त वादळ घोंगावतंय. अनेक महिला पुढे येऊन आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या व्यथा मांडत आहेत. यात एक धक्कादायक खुलासा बॉलिवूड नवाब सैफ अली खानने नुकताच केला आहे. 25 वर्षांपूर्वी सैफ शोषणाचा बळी ठरला होता. पण हे शोषण लैंगिकरित्या करण्यात आलं नव्हतं.

सैफ म्हणाला मलासुध्दा माझ्या सिनेकारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शोषणाचं शिकार व्हावं लागलं. पण हे सेक्श्युअली नव्हतं,असंही सैफने नमूद केलं आहे. सैफ म्हणतो, “ त्या विचाराने मला आजही प्रचंड राग येतो. मला त्या विषयावर बोलायला अजिबातच आवडत नाही. माझा संताप होतो. पण एवढं मात्र सांगेन की, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.”

सैफ पुढे सांगतो, “ सध्या जे काही सुरुय ते ऐकून सुन्न व्हायला होत आहे. ज्यांनी महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे, त्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी. महिलांना न्याय हा मिळायलाच हवा.”

Recommended

PeepingMoon Exclusive