By  
on  

#MeToo वर बोलले सलीम खान,‘अपनी नजरों में गिरकर खड़ा होना मुश्किल’

सध्या सिनेइंडस्ट्रीत सुरु असलेलं #MeToo नावाचं वादळ शमण्याचं काही नाव घेत नाही. रोज कोणा ना कोणासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं कळतं, किंवा कोणावर आरोप होतात. यावर अनेक प्रतिक्रीयासुध्दा उमटताना दिसतात. कोणी या मोहिमेला पाठींबा देतं तर कोणी उगीचच प्रसिध्दीसाठी हे सर्व सुरु असल्याचा दावा करतं.

काही वर्षांपूर्वीचे आरोप आता पुन्हा नव्याने उकरुन काढण्याची गरज काय असा प्रश्न या प्रकरणांवरुन उपस्थित करण्यात आला. असा प्रश्न करणाऱ्यांना बॉलिवूडचा दबंग सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. सलीम खान यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलं आहे, “ कधीच न बोलण्यापेक्षा उशिरा बोलणं चांगलं आहे. आता तुम्हाला परिणामांची प्रतीक्षा करण्याची गरज नाही, कारण जनतेचा भक्कम पाठिंबा तुमच्यासोबत आहे.”

सलीम खान या घटनांबद्दल पुढे असंही म्हणाले, “आदमी पहाड़ से गिर कर खड़ा हो सकता है…अपनी नजरों से गिरकर नहीं.”

https://twitter.com/luvsalimkhan/status/1052075629020160001

पण जेव्हा सर्वप्रथम नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता हा वाद उफाळला होता, तेव्हा मात्र या प्रकरणावर सलीम खान यांनी मौन बाळगणेच पसंत केले होते

Recommended

PeepingMoon Exclusive