By  
on  

आमिर खान, राजकुमार हिरानी, सिध्दार्थ रॉय कपूर यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या पाच फिल्ममेकर्सनी नुकतीच देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची दिल्लीत विशेष भेट घेतली. पण तातडीच्या भेटीमागचं नक्की कारण काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या भेटी मागचं कारण आहे, ते म्हणजे सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेली #MeToo मोहिम अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,आमिर खान, राजकुमार हिरानी, आनंद एल राय, सिद्धार्थ रॉय कपूर आणि रितेश सिधवानी या पाच जणांनी सोमवारी रितेश सिधवानी यांच्या घरी एक मिटींग ठेऊन बॉलिवूडमध्ये सध्या घोंघावणा-या #MeToo च्या काही मुद्द्यांवर चर्चा केली. आधी या मुद्द्यांवर काही ठोस निर्णय घेण्यात आले आणि मगच ते पंतप्रधानांसमोर मांडण्यात आले.

तसंच महत्त्वाचं म्हणजे देशाच्या संस्कृतीचा प्रचार करणं व देशाच्या तिजोरीत भर घालणं यात बॉलिवूडचे मोठे योगदान असल्याने बॉलिवूडला एका खास इंडस्ट्रीचा दर्जा देण्यात यावा, यावरसुध्दा नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याचे यात वृत्त देण्यात आले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive