पाहा फोटो : लग्नाआधी प्रियंका चोप्राने सेलिब्रेट केला ब्राईडल शॉवर

By  
on  

आपण आजपर्यंत बेबी शॉवर ऐकलंय पण आता ब्राईडल शॉवर ही एक नवी संकल्पना रुजू होतेय. लवकरच लग्नबंधनात अडकणा-या लग्नाळू मुली हे साजरं करतात. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा लवकरच आपला प्रियकर अमेरिकन पॉप सिंगर निक जोनासबरोबर बोहल्यावर चढणार आहे. म्हणूनच प्रियंकानेसुध्दा नुकताच ब्राईडल शॉवर एन्जॉय केला.

प्रियंका निकच्या लग्नाआधी त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी प्रियंकासाठी ब्राईडल शॉवर आयोजित केला होता. या वेळेचे प्रियंकाचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. व्हाईट ऑफ शोल्डर आणि फर असलेल्या गाऊनमध्ये प्रियंका खुपच सुंदर दिसतेय.

प्रियंकाच्या भावी सासूबाईंनीसुध्दा लाडक्या सूनबाईंसोबतचा एक छानसा फोटो शेअर करत  ‘So blessed’, अशी पोस्ट केली आहे.

https://www.instagram.com/p/BpfHmygFU0Z/?taken-by=mamadjonas

ब्राईडल शॉवरसाठी प्रियंका खुपच उत्साही होती. मैत्रिणींसोबत तिने या खास पार्टीत खुप धम्माल केली.

https://www.instagram.com/p/BpflRoFguf6/?taken-by=nickyanka18

प्रियंका व निकचा विवाहसोहळा 2 डिसेंबरला उदयपूरच्या उम्मेद भवन येथे राजेशाही थाटात पार पडणार असल्याचीमाहिती सूत्रांनी दिली आहे.

Recommended

Loading...
Share