By  
on  

सारा अली खानच्या 'केदारनाथ'चा उलगडला टिझर; प्रलयावर आधारित आहे सिनेमा

अभिनेता सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड पदार्पणातील 'केदारनाथ' या पहिल्या सिनेमाचा टिझर नुकताच उलगडला आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' या सिनेमात साराचा नायक म्हणून अभिनेता सुशांत सिंग राजपूत झळकतोय.

‘केदारनाथ’ सिनेमात सारा आणि सुशांतची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये जो महापूर आला त्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ही लव्हस्टोरी खुलवण्यात येत असल्याचा अंदाज या सिनेमाच्या टिझरवरुन येतोय. दिग्दर्शक अभिषेक कपूरने केदारनाथचचं एक पोस्टर शेअर करत ट्विट केलं," निसर्गाचा कोणताच रौद्र अवतार किंवा कोणतीही दैवी शक्ती प्रेमाची पराभव करु शकत नाही." येत्या ७ डिसेंबर रोजी 'केदारनाथ' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

https://twitter.com/Abhishekapoor/status/1057158087377731587

जान्हवी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता प्रेक्षकांचे लक्ष सारा अली खानकडे लागले आहेत. ‘केदारनाथ’ या सिनेमासोबतच सारा रणवीर सिंहसोबत सिंबा या सिनेमातसुध्दा झळकणार आहे. सर्वांनाच आता साराच्या या पहिल्या-वहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागलीय.

https://youtu.be/uWD2eQOQ3U8

 

Recommended

PeepingMoon Exclusive