By  
on  

ऐश्वर्याचा वाढदिवस खास गोव्यात साजरा करतोय पती अभिषेक बच्चन

माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करतेय. संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण पत्नी ऐश्वर्याचा वाढदिवसासाठी पती अभिषेकने एक खास सरप्राईज प्लॅन केलं आहे.

शुटींगनिमित्त मुंबई बाहेर असलेला अभिषेक खास मुंबईत आला आणि त्याने पत्नी ऐश्वर्यासाठी एक सरप्राईज पार्टी आयोजित केली. यात दोघांचेही जवळचे मित्र-मैत्रिणी आणि काही नातेवाईक उपस्थित होते. सर्वांनी केक कापत या छोटेखानी पार्टीत खुप धम्माल केली.

मध्यरात्रीच्या पार्टीनंतर अभिषेक प्रिय पत्नी ऐश्वर्या आणि लाडकी लेक आराध्यासह आज गोव्यासाठी रवाना झाला आहे. तिथे त्याने ऐश्वर्यासाठी खास बीच बर्थ डे आयोजित केला आहे. तेथील सेलिब्रेशन हे आणखी खास असणार आहे. तसंच बिझी शेड्यूलमधून दोघांनाही काही क्षण निवांत घालवता येणार आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive