दक्षिण सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला '2.0' या बहुचर्चित सायन्स फिक्शन सिनेमाचा ट्रेलर आज उलगडला आहे. हा भारतातील सर्वात बिग बजेट सिनेमा आहे.
आजच्या युगात सेलफोन्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण एकवेळेस आपल्या प्रियजनांपासून दूर राहू शकतो, पण सेलफोनपासून नाही. या ट्रेलरमध्ये असंच काहीसं दाखविण्यात आलं आहे. एकदा अचानक सर्वांचे सेल फोन्स हवेत उडू लागतात आणि सर्व इतरत्र सैरभैर पळतात. महत्त्वाचं म्हणजे अक्षय कुमार यात खलनायक साकारतोय. सेलफोन बाळगणा-यांवर तो निशाणा साधतोय. लोक भितीने पळतायत. आणि तेवढ्यातच एंट्री होते तू चिट्टी वर्जन 2.0 ची. म्हणजेच रजनीकांतची. या सिनेमात 4D साऊंड वापरण्यात आला आहे. यासाठी मेकर्सना 2 वर्षांचा कालावधी लागला.
2.0 हा सिनेमा बनवणं सोप्पं नव्हतं हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं आहे. दिवस-रात्र हजारो लोक या सिनेमासाठी कष्ट करत होते. 2150 वीएफएक्स शॉट्स आणि 1000 वीएफएक्स आर्टिस्टचा उपयोग करण्यात आला आहे. तसंच याशिवाय 25 3D डिझाईनर, 500 क्राफ्ट्समॅन आणि 10 कॉन्सेप्ट आर्टिस्ट यांनी यावर काम केलं आहे. थेट 3D कॅमेऱ्याने शूट करण्यात आलेला हा देशातला पहिला सिनेमा आहे. हे स्पेशल इफेक्ट्स कशाप्रकारे देण्यात आले, सेट कशाप्रकारे उभारले कलाकार आणि तंत्रज्ञानाची सांगड कशाप्रकारे घालण्यात आली हे सर्व या व्हिडीओत पाहता येणार आहे.
https://youtu.be/_qOl_7qfPOM
रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्यासोबतच या सिनेमात अभिनेत्री अमी जॅक्सनसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. बहुप्रतिक्षीत आशिया खंडातील सर्वात बिग बजेट ‘2.0’ हा सिनेमा 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.’