By  
on  

शाहिद-मीराच्या मुलाचा हा गोंडस फोटो तुम्ही पाहिलात का?

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार्स किड्सचाच खुप बोलबाला दिसतो. सैफ करिनाचा तैमूर, सोहाची इनाया तर करण जोहरच्या यश आणि रुही या स्टार किड्समध्ये आता आणखी एकाची भर पडलीय तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या झेन या गोंडस मुलाची.

मीरा नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध गोष्टी शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलाचा फोटो दिवाळीनिमित्त शेअर केला आहे. “मीराने सर्वांना आपल्या मुलाची फोटो पोस्ट करत म्हटलंय, हॅलो वर्ल्ड” यानिमित्ताने चाहत्यांनासुध्दा झेन कपूरचा पहिलाच क्यूट फोटो पाहायला मिळाला. शाहिद आणि मीराला मीशा ही मोठी मुलगी आहे. त्यानंतर यंदा सप्टेंबरमध्ये झेनचा जन्म झाला.

https://www.instagram.com/p/Bp94-p4BgSy/

 

दरम्यान, शाहिद-मीराने आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली. यावेळी तिची सासू आणि बॉलिवूड अभिनेत्री नीलिमा अजीम आणि दीर धडक फेम अभिनेता ईशान खट्टर देखील दिसत आहेत. सर्वांनी मिळून दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं हे या फोटोंवरुनच लक्षात येत आहे.

https://www.instagram.com/p/Bp6u6cVASua/

 

https://www.instagram.com/p/Bp4nVwcAIOC/

स्टार किड्सच्या प्रसिध्दीमध्ये आता झेन कोणाला मागे टाकतो किंवा कसा चर्चेत राहतो हे येणारा काळ ठरवेलच.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive